जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर — जिल्हा सेतू समिती

आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी प्रणाली

Aaple Sarkar Seva Kendra Registration Portal, District Latur — Government of Maharashtra

19/10/2026 00:13

अंतिम जाहिरात २०२६ · अर्जदारांसाठी अधिकृत माहिती

निवड प्रक्रिया

छाननी, समिती आणि निवडीची अधिकृत पद्धत

महत्त्वाचे: सर्व अपलोड केलेली प्रमाणपत्रे व कागदपत्रे स्वयंसाक्षांकित असावीत. अर्ज अंतिम सादर केल्यानंतर कोणतेही नवीन कागदपत्र स्वीकारले जाणार नाही.
०२

Selection method

निवड प्रक्रिया

जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत सेतू प्रभारी अधिकारी व जिल्हा समाजकल्याण अधिकारी हे संयुक्तरित्या अर्जांची छाननी पार पाडतील. तसेच दि. २३/०८/२००२ च्या शासन निर्णयामध्ये स्थापित केलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा सेतू समितीसमोर सदर प्रस्ताव ठेवून आपले सरकार सेवा केंद्र देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना गुणवत्तापूर्ण, पारदर्शक, वेळेवर आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देण्यासाठी व्हिलेज लेव्हल आंत्रप्रेन्युअर (VLE) यांची निवड केवळ किमान पात्रतेच्या आधारे न करता त्यांची शैक्षणिक गुणवत्ता, डिजिटल कौशल्य, पायाभूत सुविधा, आर्थिक क्षमता, प्रामाणिकपणा आणि नागरिकाभिमुख सेवा देण्याची क्षमता या सर्व बाबींच्या आधारे करण्याच्या अनुषंगाने आपले सरकार सेवा केंद्र प्रदान करण्यासाठी त्या-त्या भौगोलिक क्षेत्रात एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास खालीलप्रमाणे प्रक्रिया राबवून गुणांकन करण्यात येईल.

समितीद्वारे आणि खालीलप्रमाणे गुणांकनाची व मुलाखतीची प्रक्रिया पार पाडण्यात येईल. तसेच सदर समितीचा निर्णय अंतिम राहील.

सर्व मार्गदर्शिका नवीन अर्जदार नोंदणी रिक्त केंद्रांची यादी पहा